पुणे

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी रणजित तावरे ; अजित पवारांनी दिला होता राजीनामा

अमृता चौगुले
बारामती : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी माळेगाव बुद्रूक येथील रणजित अशोकराव तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. रिक्त जागेसाठी बुधवारी (दि. ८) संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांच्या सूचनेवरून तावरे यांचे नाव अ वर्ग मतदार संघातून निश्चित झाले. त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड पार पडली. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डाॅ. दिगंबर दुर्गाडे यांनी तावरे यांचे नाव सूचवले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक व माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले.
SCROLL FOR NEXT