पुणे

रांजणगाव महागणपतीला आंब्यांची आरास

अमृता चौगुले

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या 96 एकरावरील काही क्षेत्रात लावलेल्या आंब्याच्या झाडांच्या आंब्यांची महागणपतीला आरास केली आहे. तसेच, महागणपती उद्यानातील असलेल्या कमळाच्या फुलांचा हार महागणपतीला घालण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.

कोरोना काळात रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने महागणपती मंदिराच्या 96 एकर क्षेत्रापैकी काही भागांत केसर आंब्याची लावगड केली होती. देवस्थानच्या कर्मचार्‍यांनी कोरोना काळात या केशर जातीच्या आंब्याची लावगड करून जोपासना केली आहे. या आंब्यांची आरास श्रींच्या मूर्तीसमोर करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी देवस्थानच्या कर्मचार्‍यांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात आले असल्याचे अध्यक्षा पाचुंदकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT