पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रक्षबंधन सणाला देशाच्या कानाकोपर्यामधून बहिणी आपल्या भावासाठी राखी पाठवितात. त्यामुळे पाकिटांच्या गठ्यात चुरगळणे, फाटणे आणि बर्याचदा पावसामुळे भिजल्याने राख्यांची पाकिटे खराब होतात. याची दक्षता घेत पोस्ट विभागाच्या वतीने वॉटरप्रूफ लिफाफे विक्रीसाठी ठेवले होते. शहरातील 36 हजार 578 पाकिटांची विक्री झाली असून, याद्वारे बहिणींनी आपल्या राख्या पाठविल्या आहेत.
शिक्षण, नौकरी आदी कारणांमुळे घरापासून लांब असलेल्या तसेच आपल्या नातेवाईकांना दर सणाला बर्याचदा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टा आदींच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तरी देखील रक्षाबंधन सणाला शहरातील एकुण चवदा कार्यालयामधून दिवसाला 200 च्या जवळपास बहिणींनी राख्या पाठविल्या आहेत. यासाठी बर्याच नागरिकांनी यासाठी वॉटरप्रूफ पाकिटांचा वापर केला आहे.
दिवसाला 200 हून अधिक राखीचे पाकिटे पाठविली जात आहेत. गेल्या आठ दिवसांत 2800 पेक्षा अधिक वॉटरप्रूफ पाकिटे पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत.
राखी पाठविण्यासाठी बनविण्यात आलेल्या या वॉटरप्रूफ लिफाफयाची किंमत केवळ दहा रूपये आहे. संपुर्ण महाराष्ट्रात स्पीड पोस्टद्वारे चाळीस रूपयात राखी पाठविण्याची सोय पोस्टाने केली आहे.
राज्यासह देशात तसेच देशाबाहेर तीन ते चार दिवसांत पोस्ट विभागाकडून राख्या पोहोच केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तसेच इतर पार्सल देखील जलद पोहोच केल्याची माहिती प्रशासकिय प्रमुखांनी दिली.
हेही वाचा