Crime News 
पुणे

Pune crime : राजेगावला दोन गटातील वादात एकाचा खून, दोघे जखमी

परिसरात तणावाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

रावणगाव : राजेगाव (ता. दौंड) येथे दोन गटातील अंतर्गत वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या या घटनेत विजेंद्र भोसले या तरुणाचा खून झाला असून दोन जण जखमी आहेत. त्यांच्यावर भिगवण येथील हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. या प्रकरणी ऋषिकेश संजय भोसले यांच्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जनार्दन भोसले व महेश भोसले दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर योगेश भोसले, दिनेश भोसले, निलेश भोसले, राज भोसले हे चार जण फरारी आहेत.

फरार चार आरोपींच्या शोधात दोन पथके पोलिसांकडून पाठविण्यात आली आहेत. दोन गटात पूर्वी पासून शेतीचा वाद होता त्यातच सोमवारी जल प्राधिकरणाच्या कनेक्शनवरुन किरकोळ वादातून ही घटना धारदार हत्याराने मारहाणीपर्यंत गेल्यानंतर ही घटना घडली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT