पुणे: राज्यात एक ते चार एप्रिलदरम्यान वळीव बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी (1 एप्रिल) सातारा जिल्ह्यातील खटाव, खंडाळा, कोरेगाव व वाई या दुष्काळी तालुक्यासह कराड परिसरात वळवाच्या पावसाने मंगळवारी थैमान घातले.
अचानक आलेल्या पावसाने बळीराजाची धांदल उडाली. गहू, ज्वारीच्या सुगीवर पावसाने पाणी फिरवल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. कराड शहरात झालेल्या धुवाँधार पावसात गारपीट झाली. तसेच म्हैस दगावल्याचीही घटना घडली. मात्र, इतर जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झाली नाही. बहुतांश भागांत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, राज्याला बुधवारी (दि. 2) व गुरुवारी (दि. 3) अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी 12 जिल्ह्यांना ऑरेंज, तर अवघ्या राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारीही यलो अलर्ट देण्यात आला असून शुक्रवारपासून पाऊस कमी होईल. मंगळवारी राज्यातील विदर्भ वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या सरी पडल्या. सातारा वगळता इतर जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झाली नाही. बहुतांश भागांत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली. त्यामुळे उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला.
यलो अलर्ट (2 ते 4 एप्रिल)
पालघर (2), ठाणे (2,3), मुंबई (2), रत्नागिरी (2,3), सिंधुदुर्ग (2,3), धुळे (2), नंदुरबार (2), जळगाव (2), नाशिक (3), पुणे (3,4), कोल्हापूर (2,3), सातारा (3,4), सांगली (4), सोलापूर (4), छ. संभाजीनगर (4), परभणी (3,4), बीड (4), हिंगोली (3,4), नांदेड (3,4), लातूर (3,4), धाराशिव (3,4), अकोला (3,4), जालना (2,3), अमरावती (4), भंडारा (3), बुलडाणा (3,4), चंद्रपूर (4), गडचिरोली (3,4), नागपूर (3,4), वर्धा (3,4), वाशिम (3,4).
ऑरेंज अलर्ट (2 ते 3 एप्रिल)
पुणे (2), नाशिक (2), अहिल्यानगर (2), सातारा (2), छ. संभाजीनगर (2), जालना (2), बीड (2), अमरावती (2), चंद्रपूर (2).