पुणे: उष्णतेच्या लाटांमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढताच देशात अन् राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. बुधवारपासून पावसाचे संकेत असल्याने राज्याचा पारा एक ते दीड अंशांने घटला आहे. सोमवारी चंद्रपूर 40.6, तर पुणे शहराचा पारा 38.2 अंशांवर होता.
अतिउष्णतेमुळे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही भागांत ढगाळ वातावरण तयार होत आहे. राज्यात 19 ते 22 मार्च या कालावधीत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्याची सुरुवात सोमवारी झाली. राज्याच्या कमाल तापमानात एक ते दीड अंशांनी फरक झाला आहे.
राज्याचे तापमान..
मुंबई 32.5, पुणे 38.2, चंद्रपूर 40.6, अकोला 40.1,लोहगाव 39.5,कोल्हापूर 35.8, महाबळेश्वर 32.7, मालेगाव 37.2,नाशिक 35.6, सांगली 38.3, सातारा 37.4, सोलापूर 39.6, धाराशिव 38.1,छ. संभाजीनगर 37.2.