पुणे

Weather Update : पुण्यात पाऊस पुन्हा बरसला..! शहरात 24 तासांत झाला इतका पाऊस

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गुरुवारी रात्री 2 ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत असा 24 ते 30 तास संततधार पाऊस झाला. चार दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शहरात गारवा निर्माण झाला. दिवसभर पावसाळी वातावरणाने बहार आणली. शहरात 24 तासांत 11 ते 24 मि.मी. पावसाची नोंद झाली.

चार दिवसांपूर्वी शहरात धो धो पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. गुरुवारी दहीहंडीच्या दिवशी आकाश सकाळपासून दाटून आले. मात्र, दिवसभर पावसाने हुलकावणी दिली. सायंकाळी हलका पाऊस झाला. गुरुवारी उत्तररात्री 2 नंतर पाऊस सुरू झाला, तो शुक्रवारी दिवसभर होता. स्वागरेट, रेल्वे स्थानक परिसर, शहरातील सर्व पेठा आणि उपनगर भागांत संततधार होती. शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

शहरात 24 तासांत झालेला पाऊस (मि.मी.)

शिवाजीनगर : 11.1 र पाषाण : 13.1
चिंचवड : 24 र मगरपट्टा : 8

हेही वाचा

SCROLL FOR NEXT