पुणे

पानशेत खोर्‍यात पुन्हा पावसाच्या सरी

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: १७ सप्टेंबर रोजी सकाळपासून पानशेत, वरसगाव खोर्‍यात पावसाने काही काळ उघडीप दिली; मात्र दुपारपासून रिमझिम पावसाबरोबर अधूनमधून सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे कमी करण्यात आलेल्या खडकवासलाच्या विसर्गात सायंकाळी सात वाजता पुन्हा वाढ करण्यात आली. खडकवासलातून 8 हजार 132 क्सुसेक पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास जादा पाणी नदीत सोडण्यात येणार आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.

दिवसभरात टेमघर येथे 10, वरसगाव येथे 5 , पानशेत व खडकवासला येथे प्रत्येकी 5 मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर ओसरला आहे. आभाळ निरभ्र होऊन उन्हही पडत होते. त्यामुळे दुपारपर्यंत धरणातील पाण्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे सर्व धरणांतील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला; मात्र पुन्हा रिमझिम पावसाबरोबर अधूनमधून सरी कोसळत आहेत. पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याची भर खडकवासलात पडत आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला धरणातून उच्चांकी पाणी सोडण्यात आले. अद्यापही डोंगरी पट्ट्यात पावसाळी वातावरण आहे. सायंकाळपासून पुन्हा रिमझिम सुरू आहे. मुठा, वरसगाव, पानशेत खोर्‍यात सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे चारही धरणांतील पाण्याची आवक पुन्हा वाढली. पावसाचे प्रमाण वाढल्यास त्या प्रमाणात जादा पाणी खडकवासलातून मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खडकवासलातून 8 हजार 132 क्सुसेक विसर्ग
पावसाचा जोर वाढल्यास मुठा नदीत जादा पाणी

SCROLL FOR NEXT