पुणे

पिंपरी: उपनगरांसह मावळातील काही भागात पावसाची हजेरी

अमृता चौगुले

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_title" view="circles" /]

पिंपरी( पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी,या प्रमुख उपनगरांसह मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहर आणि तळेगाव स्टेशन परिसरात पावसाने सोसाट्याच्या वार्‍यासह, विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

पिंपरी, चिंचवड, निगडी आणि आकुर्डी परिसरात अचानक विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री साधारण आठ ते नऊ वाजे दरम्यान अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे चाकरमान्यांची धावपळ झाली.

चौकात पाणीच पाणी

दापोडी येथील शिवाजी चौक, नवी सांगवीतील एम. एस. काए चौक आणि परिसरातील इतर चौकांत पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. तसेच पिंपळे गुरव, दापोडी आणि जूनी सांगवीतील काही भागातील झाडांच्या फांद्या सोसायट्याच्या वार्‍यामुळे तुटून रस्त्यावर पडल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

शेतीचे नुकसान

हिंजवडी, कासारसाई, नेरे, मारुंजी परिसरात गुरुवारी (दि.13 एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजता वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. यावेळी काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र होते.

कांदा, भाज्यांचे नुकसान

मागील अनेक दिवसांपासून परिसरात पारा चढला होता. बुधवारी रात्री देखील तुरळक पाऊस पडला होता. गुरुवारी मात्र मोठया प्रमाणात पाऊस पडला. नुकतेच काही शेतकर्‍यांनी कांदा पिकाच्या काढणीस सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. तसेच भेंडी, टोमॅटो, फुले, कोबी या पिकांची देखील पावसामुळे नुकसान होणार आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_title" view="list" /]

SCROLL FOR NEXT