Electric Shock Death Pudhari
पुणे

Rahu Electric Shock Death: वीजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू; राहू परिसरात शोककळा

भावाला वाचवण्यासाठी धावलेल्या भावाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू; आई सुदैवाने बचावली

पुढारी वृत्तसेवा

राहू: सोनवणे मळा, राहू (ता. दौंड) येथे बुधवारी (दि. १९) सकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने ओम नितीन भोईटे (वय १८) आणि रोहित अनिल भोईटे (वय २१) या दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सोनवणे मळ्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी घरामध्ये असताना ओम भोईटे याला अचानक विजेचा धक्का बसला. भावाला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच रोहित याने त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यालाही विजेचा धक्का बसला.

दोन्ही मुलांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या आईनेही मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्या सुदैवाने बचावल्या. दोन्ही भावांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन्ही भावांना नेमका कशामुळे विजेचा धक्का बसला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास करण्यात येत असून, तपासानंतरच विजेचा धक्का बसण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ओम आणि रोहित यांच्या दुर्दैवी मृत्यूने भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सोनवणे मळ्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT