पुणे

पिंपरी : पालिकेच्या ‘करसंकलन’ची घौडदौड

अमृता चौगुले
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच सुरुवातीच्या दोन महिन्यांत तब्बल 161 कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. त्यामुळे कर संकलन विभागाची एक हजार कोटींच्या दिशेने घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. विविध कर सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारकांनी 30 जून पूर्वी कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
गतवर्षी कर संकलन विभागाच्या वतीने बिल वसुलीसाठी राबवलेली जप्ती मोहीम, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध, नळजोड तोडणे, मीम्स स्पर्धा, विविध सवलती, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून गतवर्षी पालिकेच्या इतिहासात प्रथमच 817 कोटींचा कर वसूल झाला.
अनेक मिळकतधारक कर भरत नसल्याचे गेल्या काही वर्षांत चित्र दिसत होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून  कर संकलन विभागाच्या वतीने सुरू असल्याचे विविध उपक्रम, जनजागृती, मिळकतधारकांना घरपोच बिले, घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कर भरणार्‍या नागरिकांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.
गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच सुरूवातीच्या दोन महिन्यांत तब्बल 1 लाख 33 हजार 125 जणांनी 161 कोटी रुपयांचा कर पालिका तिजोरीत जमा केला आहे. दरम्यान, महिला बचत गटांच्या महिलांद्वारे आतापर्यंत 4 लाख 80 हजार बिले घरपोच केली आहेत. उर्वरित बिले येत्या 10 ते 12 दिवसांत वाटप केले जातील, असे अधिकार्यांनी सांगितले.
वर्ष मिळकतकर जमा रक्कम भरणार्‍यांची संख्या
2018-19 45,161 48 कोटी 17 लाख 20 हजार
2019-20 57,955 62 कोटी 69 लाख 90 हजार
2020-21 21,710 21 कोटी 23 लाख 53 हजार 526
2021-22 57,948 62 कोटी 59 लाख-6 हजार 644
2022-23 77,803 97 कोटी-95 लाख 30 हजार 42
2023-24 1,33,125 161 कोटी 32 लाख 64 हजार 741

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT