पुणे

वेध गावी जाण्याचे ! एसटी आरक्षण केंद्रांवर रांगा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून, वाकडेवाडी स्थानक, स्वारगेट स्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्रांवर प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. आरक्षण केंद्रे प्रवाशांच्या गर्दीने फुल झाले असून, परिणामी, प्रवासी आता वेटिंगवर आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने आरक्षण केंद्रावर मनुष्यबळ वाढवून स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

एसटीच्या पुणे विभागाकडून दिवाळी निमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत विभागातून 1055 जागा सोडण्यात आल्या आहेत. मात्र यातील बहुतांश गाड्यांची आरक्षणे फुल झाले आहेत. तर नियमित स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून धावणाऱ्या एसटीच्या गाड्या देखील फुल भरून जात आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदानातून मराठवाडा, विदर्भ, लातूर, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि खानदेश या ठिकाणांवर जाण्यासाठी या अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT