पुरंदर-हवेलीत आघाडी आणि महायुतीला बंडखोरी रोखण्याचे आव्हान (Pudhari photo)
पुणे

Maharashtra Assembly Poll: पुरंदर-हवेलीत आघाडी आणि महायुतीला बंडखोरी रोखण्याचे आव्हान

Election 2024: पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण सध्या तापू लागले आहे.

पुढारी वृत्तसेवा

अमृत भांडवलकर

Maharashtra Politics: पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण सध्या तापू लागले आहे. उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये चुरस दिसून येत आहे. महायुतीत उमेदवारीसाठी शिवसेना (शिंदे) भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून ‘फल्डिंग’ लावली जात आहे.

पुरंदर-हवेलीत आघाडी आणि महायुतीत बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीपुढे असणार आहे. त्यामुळे सहकारी पक्षांचे स्वतंत्र मेळावे आणि सवतासुभा आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला विजयापर्यंत नेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीतील काँगेसकडून आमदार संजय जगताप एकमेव इच्छुक आहेत. महाविकास आघाडीची ही जागा पक्षाला सुटेल, याची खात्री असल्याने आमदार संजय जगताप यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी शक्तिप्रदर्शन करीत जोरदार ’फिल्डिंग’ लावली आहे. त्यांची अपक्ष लढण्याचीही तयारी सुरू आहे.

महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडून पुरंदरमधून माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे, पंडित मोडक यांच्याकडूनही उमेदवारीवर दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यांची नावे वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT