विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाही; पुरंदर प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध कायम File Photo
पुणे

Purandar Airport: विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाही; पुरंदर प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध कायम

सुपीक व सिंचनाखालील कृषी जमीन नष्ट होणार असल्याने आक्षेप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सात गावांतील (वनपुरी, उदाची वाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव) येथील शेतकर्‍यांनी पुरंदर विमानतळाला तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळासाठी एकही इंच जमीन देणार नसल्याची आपली भूमिका कायम असल्याचे शेतकर्‍यांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले.

विमानतळ विरोधी समितीचे पदाधिकारी पांडुरंग मेमाणे म्हणाले, जून 2025 मध्ये 3,000 पेक्षा अधिक तक्रारी जमा केल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही शांततामय आणि घटनात्मक मार्गाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा सातत्याने विरोध करत आहोत. आम्ही भारतीय नागरिक असूनही आपल्याच देशातच आमच्या न्यायासाठी केलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आला आहे.  (Latest Pune News)

पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भातील काही प्रमुख आक्षेप शेतकर्‍यांना आहेत. या प्रकल्पामुळे अत्यंत सुपीक व सिंचनाखालील कृषी जमीन नष्ट होणार आहे. कर्‍हा नदी, तलाव, वृक्षसंपदा व जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होणार आहे. संरक्षण मंत्रालयानेही स्पष्टपणे म्हटले आहे की, ही जमीन भौगोलिक व सुरक्षेच्या द़ृष्टीने योग्य नाही. त्यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी दिलेले (अनापत्ती प्रमाणपत्र) 29 सप्टेंबर 2021 रोजी रद्द केले आहे.

... काय आहे म्हणणे!

  • या प्रकल्पामुळे अत्यंत सुपीक व सिंचनाखालील कृषी जमीन नष्ट होणार आहे.

  • कर्‍हा नदी, तलाव, वृक्षसंपदा व जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होणार आहे.

  • संरक्षण मंत्रालयानेही स्पष्टपणे म्हटले आहे की, ही जमीन भौगोलिक व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी दिलेले (अनापत्ती प्रमाणपत्र) 29 सप्टेंबर 2021 रोजी रद्द केले आहे.

  • या प्रकल्पाची मागणी कधीच महाराष्ट्राच्या जनतेने केलेली नाही.

  • आता हा प्रकल्प प्रक्रियेत आहे, व्यापारी गट (जसे की गौतम अदानी) यांना अल्प दरात जमीन हस्तांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT