पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे मेट्रोचे काम आता अंतिम टप्प्याकडे येत असून, आगामी काही दिवसांतच पुण्याची मेट्रो वनाजपासून रुबी हॉल येथील स्थानकापर्यंत धावणार आहे, तर पिंपरीची मेट्रो फुगेवाडीचे स्थानक पार करून सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत धावणार आहे. यामुळे पुणेकर प्रवाशांना आता लवकरच रुबी हॉल मेट्रो स्टेशन आणि पिंपरीकरांना पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत प्रवास करता येणार आहे.
मार्गिका सुरू झाल्यावर ही स्थानके वाढणार…
पुण्यात गरवारे कॉलेजच्या पुढची रुबी हॉल रुग्णालयापर्यंतची स्थानके वाढणार आहेत. यात मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल स्थानक या स्थानकांचा समावेश असणार आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रो ट्रेनच्या माध्यमातून वनाज मेट्रो डेपोपासून आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेजपर्यंत प्रवास करता येणार आहे. तर पिंपरीकरांना पिंपरी मनपापासून सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत प्रवास करता येईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बि—जेश दीक्षित यांनी सांगितले.