पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर पुणे महापालिकेकडून केल्या जाणार्या उपाययोजनांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील 100 अग्रेसर शहरांच्या समूहाने पुणे शहराला 'युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब—ीद' या गटात पुरस्कारासाठी निवड केली आहे. हवामान बदलाच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देत उपाययोजना करणार्या जगातील जवळपास 100 अग्रेसर शहरांचा 'सी-40' हा समूह कार्यरत आहे. या समूहामार्फत हवामान बदलाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी विविध क्षेत्रात केल्या जाणार्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करून प्रोत्साहन दिले जाते.
या समूहाने अर्जेंटिना देशातील ब्यूनास आयरेस शहरात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहराला 'सी-40' सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ—ोपीज अॅवार्डस'चे विजेते म्हणून जाहीर केले आहे. 'युनायटेड टू क्सलरेट इमिडिएट क्शन इन क्रिटीकल सेक्टर्स', 'युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब—ीद', 'युनायटेड टू बिल्ड रेझिलीएन्स', 'युनायटेड टू इनोव्हेटीव्ह, 'युनायटेड टू बिल्ड अ क्लायमेट मूव्हमेंट अशा पाच गटात यावर्षी पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी हवेच्या गुणवत्तेबाबतचा पुरस्कार पुणे शहराला जाहीर करण्यात आला. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते.
महापालिकेने पीएमपीएमएलच्या ताफ्यात जास्तीत जास्त ई-बसेस समाविष्ट करण्यावर भर दिला आहे. या ई-बसेसमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यात मदत होत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता वाढण्यासाठी उपाययोजना करणे आणि त्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करणे या निकषांवर पुणे महापालिकेने केलेल्या कामगिरीमुळे शहराचा गौरव करण्यात आला आहे.