पुणे

Pune : ट्रॅकवरील मातीची चौकशी करणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालेवाडी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियममध्ये मोट्रोक्रॉस स्पर्धा घेण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली आणि कोणी दिली याबाबत माहिती घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहे. दरम्यान, याबाबत दै. पुढारीने सर्वप्रथम बातमी प्रसिध्द करून या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याची दखल क्रीडामंत्र्यांनी घेतली आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानावर मोटोक्रॉसची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेबाबत क्रीडा अधिकार्‍यांशी चर्चा केली असता ट्रॅक जुना झाला असून, तो आगामी काळात बदलण्यात येणार असल्याने परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्र्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबत मला काहीच माहिती नाही.

मात्र, अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकवर करोडो रुपये खर्च केलेले असतात. ते मैदान केवळ अ‍ॅथलेटिक्सपटूंनाच मिळणे गरजेचे आहे. परंतु, अधिकार्‍यांनी मोटोक्रॉससारख्या खेळाला मैदान उपलब्ध करून देत हा ट्रॅक आणखीन खराब केला आहे. या सर्व प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांनी मैदान उपलब्ध करुन का दिले, त्याचबरोबर किती नुकसान झाले याबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधितांवर नक्कीच कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले. दरम्यान, बालेवाडी येथील अनेक दिवसांचे रखडलेले ऑलिम्पिक भवनचे स्वप्न अखेर भूमिपूजनाने पूर्ण झाले आहे. शासनाने या भवनासाठी 78 कोटींची तरतूद केली असून, आगामी एक वर्षाच्या आत हे भवन उभे राहील, असा प्रयत्न राहणार आहे. सरकारकडून खेळाडूंच्या सोयी-सुविधा वाढविण्यावर आणि खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून, आगामी काळातही खेळाडूंना सरकारचे सहकार्य राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT