पुणे : वाघोली भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १२ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली.
याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाघोलीतील स्टार सिटी सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
घरफोडी करून 1 लाख 62 हजारांचा ऐवज चोरी
नवी पेठेत घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील नवले पथ परिसरात तक्रारादाराचे बैठे घर आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.