Vegetable Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Rates: दिवाळीमुळे पुण्याच्या भाजी मंडईतील उलाढाल मंदावली! आवक १० ट्रकने घटली, तरी भाज्यांचे दर स्थिर

मार्केट यार्डात ८० ट्रक फळभाज्यांची आवक; मागणी आणि पुरवठ्यात समतोल, पालेभाज्यांचे दरही ‘जैसे थे’

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: दिवाळीच्या सणामुळे शेतमालाची तोडणी मंदावल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक दहा ट्रकने घटली. राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. दुसरीकडे, दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकरांनी गावाकडची वाट धरल्याने फळभाज्यांच्या मागणीलाही ब्रेक लागला. आवक आणि मागणी दोन्हींमध्ये समतोल कायम राहिल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो, भुईमुग गुजरातहून २ टेम्पो, मटार हिमाचल प्रदेशातून १ टेम्पो, पंजाबहून १टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ टेम्पो, दिल्ली येथून १ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ३ टेम्पो, बंगलोर ३ टेम्पो आले, तमिळनाडू येथून तोतापुरी १०० क्रेट, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ४ टेम्पो आवक झाली होती.

कर्नाटकातून पावटा २ टेम्पो, तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले. सुमारे ४०० गोणी, भेंडी ३ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ३ टेम्पो, काकडी ५ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची ७ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, घेवडा सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे ५० टेम्पो आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३५०-४२० बटाटा : १००-१८०, लसूण : ८००- २५००, आले (सातारी) : ५००-६००, भेंडी : २००-३५०, गवार : ४००-६००, टोमॅटो : ८०-१३०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ४००-४५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : २५०-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १००- १५०, पापडी : ४००-५००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ५०- ६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ५००-६००, गाजर : २५०-३००, दिल्ली गाजर ७०-८०, वालवर : ३००-३५०, बीट : १५०-१६०, घेवडा : ३००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ७००-८००, मटार : ९००-१३००, पावटा : ४००-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ८००-१०००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे दर ‘जैसे थे’!

गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची १ लाख ४० हजार, तर मेथीची एक लाख जुड्यांची आवक झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालेभाज्यांच्या मागणीतही घट झाल्याचे दिसून आले. मात्र, आवक आणि मागणी यांच्यात समतोल राहिल्याने बहुतांश पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ५००-८००, शेपू : ८००-१०००, कांदापात : १०००-१२००, चाकवत : १०००-१२००, करडई : ८००-१०००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १६००-१८००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ८००-१०००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT