Pune University Pudhari
पुणे

Pune University Toon Camp: पुणे विद्यापीठात आठवडाभराचा ‘टून कॅम्प’

१८ वर्षांवरील सहभागींसाठी व्यंग्यचित्रकलेचे सखोल प्रशिक्षण; पूर्वनोंदणी अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यंग्यचित्रकला संग््राहालयातर्फे 18 वर्षांवरील सर्वांसाठी एक विशेष आठवडाभराचा ‌‘टून कॅम्प‌’ आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प सोमवार, दि. 2 ते 7 फेबुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत आयोजित केला जाणार आहे. या ‌‘टून कॅम्प‌’मध्ये व्यंग्यचित्रकलेच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या ‌‘टून कॅम्प‌’मध्ये व्यंग्यचित्रकलेची ओळख, व्यंग्यचित्रकलेचे प्रकार, कॅरेक्टर डिझायनिंग, भारतातील व्यंग्यचित्रकलेचा इतिहास, व्यंग्यचित्रकलेत वापरली जाणारी आधुनिक सॉफ्टवेअर्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा उपयोग तसेच व्यंग्यचित्र रसग््राहण, अशा विषयांचा समावेश आहे. या प्रशिक्षण सत्रांसाठी सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार सूरज ‌‘एस्के‌’ श्रीराम, चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, प्रा. विवेक मगर तसेच संग््राहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड मार्गदर्शन करणार आहेत. ‌‘टून कॅम्प‌’च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. 7 फेबुवारी रोजी व्यंग्यचित्रकला संग््राहालयात सहभागींच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य

कॅम्प यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागींस संग््राहालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ‌‘टून कॅम्प‌’साठी केवळ 20 सहभागींना संधी उपलब्ध असून, ‌‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य‌’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 7972234853 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व्यंग्यचित्रकला संग््राहालयातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT