अपघातात चक्काचुर झालेली मोटारसायकल pudhari photo
पुणे

पुणे : नगर-कल्याण महामार्गावरील अपघातात दोघे ठार

एकजण गंभीर जखमी; ओतूर हद्दीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : उत्तर पुणे जिल्ह्यातील कल्याण-नगर महामार्गावर अपघातांची मालिका अद्याप सुरूच असून सोमवारी (दि. २५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोनजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाजवळ घडला. या अपघातात छोटा हत्ती टेम्पो (एमएच १४ एचयु २३२१) ला घासून बजाज पल्सर दुचाकी (एमएच १४ डीडी ३३५२) ही टेम्पो मागून येणाऱ्या हुंदाई कार (एमएच ४३ बीजी ०८७५)च्या खाली गेली. यामध्ये दुचाकीवरील दोनजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.

रवींद्र सावळेराम भुतांबरे (वय २२) आणि कृणाल नानाभाऊ काळे (वय १७, दोघेही रा. आंबेगव्हाण मोरदरा, ता. जुन्नर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत, तर श्रीकांत खंडू काळे (वय १७, रा. आंबेगव्हाण मोरदरा, ता. जुन्नर) हा युवक या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची खबर मिळताच ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुरेश गेंगजे, शामसुंदर जायभाये, संदीप भोते, नामदेव बांबळे, नदीम तडवी, सचिन गोरे, पोलिस पाटील किरण भोर, विलास बटवाल, शुभम काशीद तात्काळ घटनास्थळी पोहचले व घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचा तपास ओतूर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT