Pune Traffic Diversion Pudhari
पुणे

Pune Traffic Diversion: पुणेकरांनो लक्ष द्या! दहीहंडी-जन्माष्टमीसाठी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल

नागरिकांना सार्वजनिक वाहतूक आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर शहरातील विविध भागांत मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पुणे शहर वाहतूक शाखेने ४ व ५ सप्टेंबर रोजी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फडके हौद परिसरात ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ पासून गर्दी संपेपर्यंत काही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड आणि फडके हौद परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. तसेच ५ सप्टेंबर रोजी शिवरकर रोडवर दुपारी ४ पासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी संविधान चौक, साळुंखे विहार रोड, फ्लॉवर व्हॅली लेन आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

तसेच या वेळी लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीची परिस्थिती लक्षात घेऊन वाहतुकीचे नियमन आणि मार्गबदल करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार काही मार्ग पूर्णपणे बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT