पुणे : शहरातील वाहतूक कोंडीला अतिक्रमणे, विद्युत खांब, मोठे पदपथ, अनधिकृत दुकाने यांसारखी विविध कारणे असल्याचे महापालिकेच्या स्थळपाहणीच्या अहवालात समोर आले आहे. यावर येत्या महिन्यात उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मंगळवारी पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले. जेथे जागा ताब्यात घ्यायच्या आहेत व मोठी कामे आहेत, त्याला महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने ती कामे नंतर हाती घेतली जाणार असल्याची माहिती पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. (Latest Pune News)
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील सुमारे 85 टक्के वाहतूक ज्या 32 रस्त्यांवरून होते, त्या 32 रस्त्यांवरील तसेच 22 जंक्शनमध्ये होणारी वाहतूक कोंडी का होते? याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. महापालिकेच्या अभियंत्यांच्या तब्बल 200 पथकांनी सर्व रस्त्यांची पाहणी करीत याबाबतचा अहवाल सादर केला आहे.
यासंदर्भात पोलिसांशी पहिली बैठक मंगळवारी पालिकेत घेण्यात आली. या बैठकीला आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त वाहतूक विभाग हिम्मत जाधव व पाच झोनचे डीसीपी उपस्थित होते. पावसकर म्हणाले, महापालिकेच्या पथकाने रस्त्यांची स्थळपाहणी केली आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात.
कोंडी फोडण्यासाठी महापालिका करणार ‘या’ उपाययोजना
पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण काढून त्यांना पर्यायी जागा देणार
अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई होणार
वाहनचालकांना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्यांलगत आरक्षित जागा शोधणार
अनधिकृत रिक्षाथांब्याचेस्थलांतर करणार
स्वतंत्र सायकल ट्रॅकऐवजी लाल रंग देऊन तो भाग सायकलस्वारांना देणार
पुण्यातील 32 रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मंगळवारी आयोजित बैठकीत आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी आदी.