Bhave Highschool accident Pune Pudhari
पुणे

Pune Car Accident: पुण्यात भरधाव कारने MPSC च्या 11 विद्यार्थ्यांना उडवले, चालकाने मद्यपान केल्याचा संशय

Pune Bhave Highschool Accident Update: जखमी स्‍पर्धा परीक्षेचा अभ्‍यास करणारे बहुतांश विद्यार्थी : चौघांच्या पायाला फॅक्‍चर

पुढारी वृत्तसेवा

Pune Car Crash Mpsc Student Tea Stall Near Sadashiv Peth

पुणे : पुणे येथे भावे हायस्कूल जवळ एका भरधाव कारने 12 जणांना उडवल्‍याची घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेले हे सर्वजण एमपीएसीचा अभ्‍यास करणारे विद्यार्थी असून सर्वजण टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने मद्यपान केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

शनिवारी संध्याकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ भरधाव कारने चहाच्या टपरीवर थांबलेल्या 12 विद्यार्थ्यांना उडवले. कार पिवळ्या नंबरप्लेटची असून कारचालकाने मद्यपान केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्‍थळी पोहोचले.

जयराम शिवाजी मुळे असे कार चालकाचे नाव असून या भीषण अपघातात बारा जण जखमी झाले आहेत. जखमी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. संध्याकाळी चहा पिण्यासाठी सर्वजण टपरीवर गेले होते. जखमींपैकी चौघा विद्यार्थ्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

विश्रामबाग पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. कारचालकाने मद्यपान केले होती की नाही, याबाबत अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

जखमी विद्यार्थ्यांमध्ये अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT