पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३९ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली.
याबाबत एकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत.
एनडीए-वारजे रस्त्यावरील शिवणे भागात असलेल्या लक्ष्मी शांतीबन सोसायटीत ते राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ३९ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली.