Sanjay Gaikwad Pudhari
पुणे

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करा; सोनाली कांबळेंची मागणी

आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी सोनाली त्रिंबक कांबळे यांनी केली. पोलिसांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महिलांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून जी तत्परता दाखविण्यात आली, तीच तातडी महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत दाखवली गेली पाहिजे.

म्हणूनच हा दुजाभाव सोडून गायकवाड यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सोनाली त्रिंबक कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ केली होती, त्याकडे लक्ष वेधत सोनाली कांबळे म्हणाल्या, मी मागच्या 5 सप्टेंबरला पतीसोबत दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते.

तेथून आम्ही कोथरूडमध्ये आलो असता एका टपरीवर चहापान करण्याकरिता थांबलो. या निवांतक्षणी मी सहजपणे मोबाईल उघडला. मोबाईलमधील रिल बघत असताना संबंधित व्हिडीओ समोर आला.

तो पाहत असताना माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली. असा प्रकार कुणाबाबतही होऊ नये, याकरिता मी कोथरूड पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्यानंतर तुमचा अर्ज लिहून आणा. आम्ही तुमचा गुन्हा नोंद करतो, असे मला सांगण्यात आले. म्हणून मी अर्ज लिहून दिला. परंतु, यानंतरही मला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

संतोष पंडित यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले, तर त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल झाला. अपरात्री त्यांना घरातून उचलण्यात आले. पण, दुसरीकडे आमदाराने अश्लील शिवीगाळ केल्यानंतर व माताभगिनींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारचे वर्तन केल्यानंतरही या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही तत्परता दाखवली गेलेली नाही, अशी मागणीही कांबळे यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT