खडकवासला : धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम सुरूच असून, पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. सध्या २ हजार ९५ क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. धरणसाखळीत मंगळवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता २९.०३ टीएमसी म्हणजे ९९.६० टक्के साठा झाला होता.
वरसगाव धरणामधून सध्या ६०० आणि टेमघर धरणातून ३०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. या पाण्याची तसेच धरणक्षेत्रातील ओढे नाल्यांतील पाण्याची आवक खडकवासलात सुरू आहे. पानशेतपेक्षा खडकवासला परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी दिवसभरात खडकवासला येथे १७ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे २ व वरसगाव येथे तुरळक १ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पानशेतचा विसर्ग बंद केल्याचे पानशेत धरण विभागाचे शाखा अभियंता प्रतीक्षा रावण यांनी सांगितले.
खडकवासला धरणसाखळी एकूण पाणी साठवणक्षमता : २९.१५ टीएमसी
मंगळवारचा पाणीसाठा : २९.०३ टीएमसी (९९.६० टक्के)
खडकवासला १.८७ : ९४.७९
पानशेत १०.६३ : ९९.८६
वरसगाव १२.८२ : १००
टेमघर ३ .७१ : १००