Pudhari Photo
पुणे

Pune Rainfall : पुणे जिल्ह्यात पावसाचा धडाकेबाज पुनरागमन! लोणावळ्यात १६० मिमी, घाटमाथ्यावर मुसळधार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राजगुरुनगर ७७.५, तर माळीण येथे ४३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर घाटमाथ्यावर यंदाच्या हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाल्याने सरासरी १०० ते १६० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची प्रथमच नोंद झाली.

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊसच नव्हता. त्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकही चिंतेत होते. पाऊस कधी पडतो याचीच सर्वजण आतुरेने वाट पाहात होते. मात्र, रविवारपासून जिल्ह्यातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली.

राजगुरुनगर भागात सलग दुसऱ्या दिवशी ७० मि. मी.पेक्षा जास्त पाऊस झाला, तर उर्वरित तालुक्यात २० ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर यंदाच्या हंगामातील पहिल्या मुसळधार पावसाने बहार आणली. लोणावळासह सर्वच भागात १०० ते १६०मि.मी. पावसाची नोंद झाली.

सोमवारी जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)

राजगुरुनगर ७७.५, माळीण ४३.५, डुडुळगाव ३६.५, नारायणगाव ३६, बारामती २२.४, दापोडी २२, दौंड २१, निमगिरी १८.५, शिवाजीनगर ११.८, शिरुर ६, बालेवाडी ५, चिंचवड २, पाषाण ०.५. गिरीवन ०.५

घाटमाथ्यावरचा पाऊस (मिमी)

लोणावळा १६०, शिरगाव ६०, वळवण १२५, डुंगरवाडी १५८, कोयना १२५, ताम्हिणी १२५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT