Pune Rain Update
अतिवृष्टीमुले पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आलेली आहेत.  Pudhari
पुणे

Pune Rain Update | पुण्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत अनेक पूल, सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धोकायदायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. Pune Flood Upate

जिल्ह्यातील खेड, जुन्नर आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा परिसरातही मुसळधार पाऊस पडला आहे. या ठिकाणच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात खासगी ऑफिसेसना सुटी देण्याचे आदेश दिल्यानंतर सुटी जाहीर करण्यात आली. सर्व सरकारी कार्यालये सुरू आहेत. मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. Pune Flood Upate

Pune Flood Upate | पुणे जिल्ह्यातील ४०० नागरिकांचे स्थलांतर

पूलावरून पणी वाहत असताना त्यावरून जाणे टाळावे, दरडप्रवण गावांत कर्मचारी, सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, असे डॉ. दिवसे यांनी सांगितले. या गावांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४०० नागरिकांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे. कोणत्याही गावाचा अद्याप संपर्क तुटलेला नाही. लोणावळा परिसरात काळजी घेण्यात येत आहे. पुणे शहरात नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. लवासा मुळशी रस्त्यामध्ये दरड कोसळल्याने तीन व्यक्ती अडकल्याची माहिती असून तेथे काम सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT