Pudhari File Photo
पुणे

Pune Rain : पुणे जिल्‍ह्यात मंगळवारी हलक्या पावसाची हजेरी

बुधवारपासून मध्यम ते मुसळधारेचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी दमदार पाऊस झाला. मंगळवारी मात्र तुरळक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. इंदापूरमध्ये २७ मि. मी. पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, जुलैमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. १ ते ५ जुलैदरम्यान घाटमाथाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी जिल्ह्यात झालेला पाऊस

इंदापूर २७, एनडीए ४.५, निमगिरी ४, बारामती २, हडपसर १, पाषाण ०.६, शिवाजीनगर ०.५, दापोडी ०.५, माळीण ०.५, शिवाजीनगर ३.६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT