Rain Pudhari
पुणे

Pune Rain Alert: पुण्यात मुसळधार पावसाचा दिलासा; तापमानात तब्बल 7 अंशांची घसरण

मान्सूनपूर्व पावसाने शहर गारठले; रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने शहराचा पारा 40 अंशांवरून थेट 34.7 अंशांवर आला आहे. पारा तब्बल 7 अंशांनी खाली आल्याने मे महिन्यातील हे नीचांकी कमाल तापमान ठरले. दरम्यान, रविवार आणि सोमवारी शहराला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शुक्रवारी शहरातील हडपसर, एनडीए भागात 30 मि.मी., तर चिंचवड भागात 60 मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव शहरातील मध्यवस्ती आणि उपनगरांत सरासरी 13 ते 15 मि.मी. पाऊस पडल्याने रस्त्यांवर पूर आला होता. त्यामुळे शहराचे कमाल तापमान 40 अंशांवरून 34.7 अंशांवर खाली आले होते. मे महिन्यात शहराचे कमाल तपामान प्रथमच इतके खाली आले आहे.

शहरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव

शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाने बहार आणली. कमाल तापमानात 7 ते 8 अंशांनी घट झाली असून, कमाल, किमान तापमानात खूप कमी अंतर झाले आहे. शहरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव असून, वेग ताशी 30 ते 35 कि.मी. आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी (दि. 23 आणि 24 मे) शहराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT