suspension News File Photo
पुणे

Pune ZP | चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील शाळेत गैरवर्तन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

Purandar extension officer suspension

पुणे : पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा प्रकरणात गैरवर्तन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ गोविंद हरिभाऊ लाखे यांना निलंबित केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याने शाळेला भेट दिल्यानंतर चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्यामुळे जिल्हा परिषद संस्थेची बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

निलंबन कालावधीत लाखे यांचे मुख्यालय पंचायत समिती वेल्हा येथे निश्चित करण्यात आले आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय किंवा नोकरी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाच्या नियमांनुसार निलंबन काळात त्यांना निर्वाहभत्ता देण्यात येणार असून, आदेशातील अटींचा भंग केल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT