पुणे

पुणे पुढारी ८४ वा वर्धापन दिन स्नेहमेळावा : क्षणचित्रे (फोटो)

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा : नि:पक्ष व निर्भीड विचारांचा देदीप्यमान कृतिशील वारसा जपत गेली ८४ वर्षे वाचकांच्या भरभक्कम साथीने वाटचाल करणारा दैनिक 'पुढारी' मंगळवारी (३ जानेवारी) रोजी पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांशी आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या अतूट नात्याची वीण आणखी घट्ट करत पुणे दै. 'पुढारी'चा वर्धापन दिन मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्त 'पुढारी'च्या मुख्य कार्यालयाजवळील मॅरेथॉन भवन येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या दै. 'पुढारी'चा वर्धापन दिनाचा सोहळा म्हणजे पुणेकरांसाठी कौटुंबिक सोहळाच आहे. या सोहळ्यासाठी मॅरेथॉन भवन परिसरात नयनमनोहारी रोषणाईने सजवण्यात आला आहे. आकर्षक सजावट, भव्य व्यासपीठ, गालिचाने आच्छादलेला प्रवेश मार्ग, स्वागत कमान आणि त्याला सुसंगत अशा विविध रंगांची उधळण करणारी प्रकाश योजना यामुळे गर्द हिरवाईने नटलेल्या या मॅरेथॉन भवनचे सौंदर्य आणखी खुलले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील भागीदार आणि साक्षीदार असलेल्या दै. 'पुढारी'च्या मित्र मंडळ चौकातील कार्यालयाच्या इमारतीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT