पुणे : पुढारी वृत्तसेवा : ओला-उबेरची सेवा प्रवाशांना सोयीची वाटत असली तरी, रिक्षा आणि कॅब चालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्याविरोधात शहरातील विविध संघटना बुधवारी (दि.25) आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रन्सपोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आनंद तांबे, मोहम्मद शेख, विलास केमसे, एकनाथ ढोले, बाळासाहेब शिंगाडे आदी उपस्थित होते. (Pune News)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भांडवलदार कंपन्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी अॅग्रीकेटर कायदा लागू केली जाईल, असे आश्वासन दिले. सणासुदीमध्ये संप करणे नागरिकांच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन कंपनी सारखा मोबाईल अॅप्लिकेशनवर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी पुरुष महिला वर्ग संप पुकारणार आहेत. मात्र, या संपात रिक्षा चालक सहभागी होणार नाहीत, असे स्पष्ट केले. (Pune News)
देशातील विविध शहरांमध्ये ओला-उबेर सारख्या कंपन्याविरोधात आंदोलन सुरु आहे. तर सर्व संघटनांनीं एकत्र येऊन या कंपन्या विरोधात लढा देणार नाही, तोपर्यंत रिक्षा आणि ओला-उबेर चालकांचा प्रश्न सुटणार नाही. उद्या मंगळवारी पुणे आरटीओ कार्यालयासमोर विविध संघटनांच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये सुमारे 200 जण सहभागी होतील. तर शहरातील रिक्षा सेवा ही पुर्ववत सुरु रहाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
ओला-उबेर कंपन्यांकडून चालकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. ती थांबविण्यासाठी आणि प्रवाश्यांना चांगली सेवा देण्यासाठी ओला-उबेर सारखे मोबाईल अॅप विकसित करावे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या मनमानीला चाप बसेल. तसेच रिक्षा आणि कॅब चालकांना प्रवाशांना चांगली सेवा देता येईल. त्यामुळे सरकारी मोबाईल अॅप सुरु करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा