पुणे : हिवाळी सुट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते प्रयागराज यादरम्यान दोन एकमार्गी (वन-वे) विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1) गाडी क्रमांक 01411 (पुणे-प्रयागराज विशेष)
- ही गाडी पुण्यातून शनिवारी 27 डिसेंबर 2025 रोजी पुणे स्थानकावरून सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि सोमवारी 29 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल.
2) गाडी क्रमांक 01499 (पुणे प्रयागराज विशेष)
- ही गाडी बुधवारी 31 डिसेंबर 2025 रोजी पुणे स्थानकावरून सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल.
या दोन्ही गाड्या प्रवासात हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी आणि फतेहपूर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.