पुणे

Pune Porsche Accident | बायोलॉजिकल वेस्टमध्ये फेकले अल्पवयीन मुलाचे रक्त

संकेत लिमकर

पुणे : पुढारी वृत्तेवा : कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातानंतर मुलाची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह यावी, यासाठी ससूनमधील डॉक्टरांच्या मदतीने शिवानी अगरवाल यांचे रक्त घेण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अल्पवयीन मुलाचे रक्त हे बायोमेडिकल वेस्टमध्ये फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. ससूनमधील बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याचे काम एक कंपनी करते. पोलिसांनी फेकून दिलेल्या मुलाच्या रक्ताचे नेमके काय झाले, याची माहिती कंपनीकडून घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने केले कृत्य
  • अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह येण्यासाठी केला खटाटोप
  • रक्ताचे नेमके काय झाले, याची पोलिसांकडून चौकशी सुरू

19 मे च्या पहाटेच्या अपघातानंतर वैद्यकीय चाचणीदरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. बदलण्यात आलेले रक्तनमुने शिवानी अगरवाल यांचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे रक्त बदलल्यामुळे घटनेला वेगळे स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे मूळ गुन्ह्याव्यतिरिक्त इतर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत गेली व गुंतागुत देखील वाढत गेली. ससून रुग्णालयातील कारभारावरही यानिमित्ताने टीका झाली.

दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला आरोपी अश्पाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिले होते. घटकांबळे याने यातील अडीच लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि स्वतःकडे 50 हजार ठेवून घेतले होते.

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके
SCROLL FOR NEXT