शेळगाव: इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी व सोलापूर जिल्हातील मोहोळ विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय घनिष्ठ निकटवर्ती माजी आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे, ते बुधवारी( दि 29 मुंबई येथे भाजप पक्ष प्रवेश करणार आहेत.
माजी आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापने पासून पक्षाबरोबर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत असून अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून माने यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन 2013 ते 2016 दरम्यान पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ताब्यातील इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती सन 2016 मध्ये हिसकावून घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता खेचून आणली. त्या बाजार समिती मध्ये सन 2016 ते सन 2021 पर्यत त्यांनी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.सन 2021पासून संचालक म्हणून काम पाहात आहेत.
सन 2019 मध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यशवंत माने यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघात तिकिटे दिले. त्या निवडणूकित माने हे 22 हजाराहून अधिक मतांनी ते विजयी झाले. सन 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर यशवंत माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत गेले. सन 2024 मध्ये यशवंत माने यांना पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. मात्र निवडणूकीमध्ये त्यांचा पराभव झाला.
पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मागील पाच वर्षात 3500 हजार कोटींहून अधिकाचा विकास निधी दिला. त्याबद्दल मी अजित पवार मनापासून आभारी आहे.-माजी आमदार यशवंत माने