पुणे : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत आज (दिनांक) पार पडली. या सोडतीमध्ये एकूण सात सभापतीपदे महिलांसाठी राखीव ठरली आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग) आणि सर्वसाधारण अशा प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शाखेच्या समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते आदी उपस्थित होत्या.
जिल्ह्यात एकूण तेरा पंचायत समित्या आहेत. या सर्व पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी संपला आहे. मागील काही वर्षांपासून या संस्थांवर प्रशासक राज सुरू आहे.
जुन्नर, शिरुर, मावळ, वेल्हे, मुळशी, भोर, खेडचे पंचायत समिती सभापती पद महिलांसाठी राखीव तर हवेली, बारामती, आंबेगावचे सभापती पद सर्व प्रवर्गासाठी खुले
- इंदापूर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे.
- जुन्नर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव राहणार आहे.
- दौंड पंचायत समिती सभापती पद नागरीकांचा मागासवर्ग (ओबीसी) साठी राखीव राहणार आहे.
- पुरंदर पंचायत समिती सभापती पद नागरीकांचा मागासवर्ग (ओबीसी) साठी राखीव राहणार आहे.
- शिरुर पंचायत समिती सभापती पद नागरीकांचा मागासवर्ग महिला (ओबीसी) साठी राखीव राहणार आहे.
- मावळ पंचायत समिती सभापती पद नागरीकांचा मागासवर्ग महिला (ओबीसी) साठी राखीव राहणार आहे.
- वेल्हे पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी साठी राखीव राहणार आहे.
- मुळशी पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी साठी राखीव राहणार आहे.
- भोर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
- खेड पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
- हवेली पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे
- बारामती पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे
- आंबेगाव पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे