Illegal Overhead Cables Pudhari
पुणे

Pune Illegal Overhead Cables: बेकायदा ओव्हरहेड केबल हटवण्याची मोहीम तीव्र

कात्रज-कोंढवा परिसरात हजारो किलोमीटर केबल काढल्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील बेकायदा ओव्हरहेड केबलविरोधात महापालिकेने कारवाईला वेग दिला असून, सलग दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरू ठेवण्यात आली. मुंढवा आणि कोंढवा परिसरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर सुमारे साडेचार हजार किलोमीटर लांबीच्या केबल काढण्यात आल्या.

दरम्यान, या कारवाईत अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून महापालिका प्रशासन जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. शहराचे विद्रूपीकरण आणि अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत ओव्हरहेड केबल हटविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या केबलना परवानगी घेऊन भूमिगत केल्यास महापालिकेला सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

शहराचे सौंदर्य आणि सुरक्षितता सुधारण्यास मदत होईल, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पात या कारवाईची घोषणा केली होती. त्यानुसार विद्युत विभागाने 1 एप्रिलपासून बेकायदा केबल काढण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात केबल कंपन्यांकडून न्यायालयीन अडथळे येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करावी, असे निर्देश भिमाले यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT