पुण्यात जीबीएसमुळे नववा मृत्यू File Photo
पुणे

पुण्यात 'जीबीएस'मुळे नववा मृत्यू

Pune News : वाघोली येथील तरूणाचा 'जीबीएस'ने घेतला बळी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोममुळे (जीबीएस) शहरात सोमवारी (दि.१७) आणखी एका मृत्यूची नोंद झाली असून जिल्ह्यातील 'जीबीएस'मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालात ९ मृत्यूंपैकी ४ मृत्यू जीबीएस आणि ५ संशयास्पद मृत्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वाघोली येथील ३४ वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. रुग्णाला आधी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. रुग्णाला ३ ते ८ फेब्रुवारी या काळात मानेचे स्नायू, श्वसनाचे स्नायू, चेहर्‍याचे स्नायू आणि गिळण्याचे स्नायू यांची शक्ती कमी झाली. त्याला ७ फेब्रुवारी रोजी श्वासोच्छवासाच्या स्नायूंचा अर्धांगवायू, मानेच्या स्नायूंचा अर्धांगवायू झाला. रुग्णावर उपचार सुरु असताना शनिवारी (दि.१५) सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT