पुणे : राज्यात थंडीचा कडाका सोमवारपासूनच कमी होण्यास सुरुवात झाली असून, किमान तापमान बुधवार (दि.१४) संक्रांतीपासून हळूवार वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रविवारपर्यंत राज्यात चांगलाच गारठा होता. मात्र, सोमवारी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाल्याने सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जाणवणारा गारठा कमी होण्यास सुरुवात झाली. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरीचा प्रभाव कमी होण्यास किमान एक आठवडा लागणार आहे. दरम्यान, किमान तापमानात १४ जानेवारीपासून हळूवार घट होईल असे संकेत आहेत.
गोंदिया ९.५, पुणे १०.९, अहिल्यानगर १०.३, जळगाव १०.७, कोल्हापूर १९.४, महाबळेश्वर १४.१, मालेगाव १०, नाशिक ११.४, सांगली १९.९, सातारा १३.९, सोलापूर १९.३, मुंबई २१, रत्नागिरी २२, छ. संभाजीनगर १२, परभणी १४.२, अकोला १३.७, अमरावती १२.५, नागपूर १०.२