पीटी शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार file photo
पुणे

पीटी शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : निगडी-प्राधिकरणातील कीर्ती महाविद्यालयात गेल्या दोन वर्षापासून एका अल्पवयीन मुलीचा पीटीच्या शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार केला जात होता. हा छळ मुलीने २०२२ ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत सहन केला. मात्र घटनेची माहिती मुलीने वडिलांना दिल्यावर मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शिक्षकाला अटक केली व त्यावर पॉक्सो दाखल केला आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकासह इतर सहा जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी शिक्षक निवृत्ती देवराम काळभोर (रा. औदुंबर निवास, साई हौसिंग सोसायटी, गुरुद्वारा चिंचवड) हा गेल्या दोन वर्षापासून पीडित मुलीचा लैंगिक छळ करीत होता. सततच्या या त्रासाला कंटाळून मुलीने सदर घटना वडिलांना सांगितली, अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली. यापूर्वी देखील त्या शिक्षकावर निगडी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील शाळा व्यवस्थापनाने शिक्षकास पुन्हा नोकरी देऊन लैंगिक छळाच्या कृत्यास प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक अशोक जाधव यांच्यासह रोहिदास बलभीम जाधव, लक्ष्मण नामदेव हेंद्रे, अवींद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT