पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षाच्या शैक्षणिक सत्रापासून एक वर्षाची पदव्युत्तर पदवी सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना एक वर्ष आणि दोन वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असेल. याशिवाय, पदवीमध्ये ज्या विषयांचा अभ्यास केला जाईल, तेच विषय निवडण्याचे निर्बंधही शिथिल करण्यात आल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट
केले आहे.
सीयूईटी-2024 मध्ये त्यांच्या आवडीच्या विषयात पात्रता मिळवून विद्यार्थी मास्टर्सचा अभ्यास करू शकतील. यूजीसीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत तयार केलेल्या पदव्युत्तर कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क मंजूर करण्यात आले आहे. हा मसुदा या आठवड्यात राज्ये आणि विद्यापीठांना पाठवला जाणार असल्याचे जगदीश कुमार यांनी
म्हटले आहे.
चार वर्षांच्या यूजीसी प्रोग्राममध्ये, जर एखाद्या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र हा मुख्य विषय म्हणून आणि अर्थशास्त्र हा दुसरा विषय म्हणून अभ्यास केला असेल, तर तो मास्टर्समध्ये प्रमुख आणि इतर विषयांपैकी कोणताही विषय निवडण्यास सक्षम असेल. एखाद्या विद्यार्थ्याला मास्टर्समध्ये स्ट्रीम बदलायची असेल, तर तो पर्यायही उपलब्ध असेल. वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर्स करायचे असल्यास, त्यांना त्या विषयात 'सीयूईटी पीजी 2024' किंवा इतर कोणत्याही प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
हेही वाचा