पुणे

Pune News : धनकवडीत पडला अतिक्रमणांवर हातोडा

Laxman Dhenge

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका बांधकाम विभाग व धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने धनकवडी परिसरातील भारती विद्यापीठाच्या मागील गेटसमोरील अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण चार हजार स्क्वेअर फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. भारती विहार आणि पीआय सीटी कॉलेज रस्त्यावर सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरुले यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

परिसरात वाहतुकीला अडथळा होत असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्याने ही कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभागचे (झोन क्र.5) कनिष्ठ अभियंता वंदना गवारी, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे शाखा अभियंता भावना जाडकर, अतिक्रमण निरीक्षक किरण डवरी, सागर विभुते यांच्या पथकाने भारती विहार व पतंग प्लाझा परिसरात ही कारवाई केली. या कारवाईत एकूण 14 काउंटर, 5 टेबल, 2 हातगाडी, 10 खुर्ची , 13 स्टूल, 2 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. यापुढेदेखील कारवाई सुरू राहणार असल्याचे या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT