पुणे

Pune News : खेड बाजार समितीच्या अशोक राक्षे यांचे संचालकपद कायम

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मोठी नाट्यमय घडामोड घडली आहे. विद्यमान संचालक तथा माजी उपसभापती अशोक राक्षे यांचे संचालकपद कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे मंगळवारी (दि. २८) होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप मोहिते गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

सन २०२४ मध्ये बाजार समितीची सत्ता बदलल्यानंतर मोहिते गटाकडून अशोक राक्षे यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विविध स्तरांवर तक्रारी आणि याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी तहसीलदार प्रशांत बेडसे आणि प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी अशोक राक्षे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर मोहिते गटाने या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर सोमवारी (दि. २७) उच्च न्यायालयाने अशोक राक्षे यांचे संचालकपद कायम ठेवत त्यांच्या बाजूने निकाल दिला.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर या निकालाचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सभापती पदासाठी अशोक राक्षे हेच प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT