पुणे

Pune News : अनधिकृत गोडाऊनवर बिबवेवाडीत कारवाई

Laxman Dhenge
बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील आईमाता मंदिराशेजारी डोंगरमाथ्यावरील अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण व अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या वेळी सुमारे चार हजार चौरस फुटांवरील पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. डोंगर माथा व उतारावर अनेक प्रकारचे गोडाऊन व पत्र्याचे शेड आहेत. त्यात काही अधिकृत आहेत. प्रशासनाकडून या गोडाऊनच्या मालकांना वेळोवेळी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.
गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील अनेक ठिकाणी नव्याने गोडाऊन उभारले आहेत. आईमाता मंदिराशेजारी डोंगर माथ्यावर असलेले गोडाऊन अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. गोडाऊनचे मालक मुथा म्हणाले, 'महापालिका डोंगरमाथ्यावरील गोडाऊनवर कारवाई करीत आहे. परंतु, कोणत्या ठिकाणी करणार, हे माहीत नव्हते. अचानक केलेल्या कारवाईने आमचे मोठे नुकसान झाले आहे.'  जागामालक संदेश ओसवाल म्हणाले, 'महापालिकेने नोटीस न देताच ही कारवाई केली असून, ती एकतर्फी आहे.'
बिबवेवाडी परिसरातील डोंगरमाथा व उताराच्या भागातील अनधिकृत गोडाऊन व पत्राशेडबाबत तक्रारी येत आहेत. यामुळे यापुढे दर आठवड्याला कारवाई केली जाणार आहे.
– उमेश शिद्रुक,  शाखा अभियंता, बांधकाम  नियंत्रण विभाग, महापालिका
हेही वाचा
SCROLL FOR NEXT