पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक पदावरून पुण्यात बदली करण्यात आली. गुरुवारी राज्य शासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. मात्र डॉ. अभिनव देशमुख यांच्या बदलीबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. (Pune New SP)
गोयल यांनी नक्षलवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. अनेक नक्षलवाद्यांना त्यांनी शरण येण्यास भाग पाडले व शरण आल्यानंतर त्यांचे समुपदेशन देखील केले. नक्षलवादी चळवळींचा बिमोड करण्यासाठी त्यांनी विविध उपयोजना देखील केल्या आहेत. नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावल्यानंतर गोयल यांची आता पुणे येथे बदली करण्यात आली आहे. (Pune New SP)
हेही वाचा