पुणे

Pune breaking | नसरापूर पीडितेच्या नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी केला नवले ब्रिज बंद, चार तासापासून मुंबई बंगळूर महामार्ग ठप्प!

मुख्यमंत्री आणि बाल आयोगाचा माणूस आल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही आंदोलका आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

पुणेः काल भोर तालूक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षाच्या बालीकेवर अत्‍याचार करुन खून झाला होता. याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल आंदोलकांना पूणे सातारा महामार्ग बंद केला होता. आज पिडीत मुलीचे शव अंबुलन्स मध्ये आणून रास्ता रोको सुरू, दोन्ही बाजूने मुंबई बंगलोर हायवे रोखून धरला आहे. यामुळे नवले ब्रिज परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे.

स्वरणा हॉटेल समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूने गेल्या तासाभरापासून हायवे ठप्प आहे, आंदोलक एकही गाडी जाऊ देत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येईपर्यंत महामार्ग मोकळा करणार नाही, बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रास्ता मोकळा करणार नाही, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आरोपीला गोळ्या घाला, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे-

दरम्यान नरसापूर येथील धक्कादायक घटनेला २४ तास उलटूनही प्रशासकीय पातळीवर उदासीनता पाहायला मिळाल्याने, विशेषतः बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी या घटनेची माहिती घेण्यासाठी न आल्याने अत्याचार करून खून केलेल्या चिमुकलीच्या नातेवाईकांचा आणि स्थानिकांचा संयम सुटला. याचाच परिणाम म्हणून शनिवारी (दि.२) सायंकाळी पुण्यातील नवले पूल ते वडगाव पूल दरम्यान संतप्त नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी 'रास्ता रोको' आंदोलन पुकारले, त्यामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गाची वाहतूक गेल्या चार तासापासून पूर्णपणे ठप्प झाली.​

बाळाचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून ठिय्या....

​ अत्यंत हृदयद्रावक आणि संतापाने आंदोलकांनी पीडित चिमुरडीचा मृतदेह रुग्णवाहिकेत आणून थेट महामार्गावर ठेवला केला. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि मुख्यमंत्री घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही आणि रस्ताही मोकळा करणार नाही, अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतली, त्यामुळे त्यांनी येथील महामार्ग पूर्णपणे ठप्प केला.

​दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प....

​गेल्या तीन तासांहून अधिक काळ मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी आणि साताऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सुवर्णा हॉटेल समोरील रस्त्यावर आंदोलकांनी एकही वाहन पुढे जाऊ दिलेले नाही. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

​आंदोलकांच्या संतप्त मागण्या आणि घोषणाबाजी

​आंदोलनस्थळी वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नराधमाला थेट गोळ्या घाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय महामार्ग मोकळा करणार नाही, बाल हक्क आयोगाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. अशी मागणी चिमुकलीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

​पोलीस प्रशासनाची दमछाक

​परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधिकारी नातेवाईकांची समजूत काढण्याचा आणि त्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती करत होते. मात्र, जोपर्यंत ठोस आश्वासन आणि आरोपीला कडक शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, या भूमिकेवर आंदोलक ठाम होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT