पुणे

पुणे : महापालिकेचे ’ज्येष्ठ नागरिक धोरण’ कागदावरच

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकतर्फे नोव्हेंबरमध्ये पहिले 'जेरियाट्रिक केअर' अर्थात ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण तयार केले होते. याअंतर्गत ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्यसेवा, समुपदेशन, कायदेशीर सल्ला, फिजिओथेरपी आदींचा समावेश करण्यात आला होता. मात्र, अद्याप धोरणाला मुहूर्तच मिळालेला नाही. ज्येष्ठ नागरिक धोरणाचा शहरातील 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अंदाजे साडेचार ते पाच लोकांना लाभ घेता येऊ शकतो. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, कायदेशीर आणि समाजकल्याण विभागासह अनेक विभागांशी सल्लामसलत करून हे धोरण तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणे सोपे व्हावे, तसेच त्यांना त्यांचे हक्क जाणून घेणे सोपे व्हावे, यासाठी विभागांनी त्यांच्या सूचना पाठवल्या होत्या.

धोरणामध्ये शहरी-गरीब योजनेचे कार्ड असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा, वृद्धांसाठी मोफत डायलिसिस सेवा, एकटे
राहणार्‍या, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा बेघर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचारासाठी एक खिडकी योजना आदींचा समावेश आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार यासाठी उपचार मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्याव्यतिरिक्त विविध समाजकल्याण केंद्रांमध्ये त्यांना कायदेशीर सल्ला आणि मानसशास्त्रीय समुपदेशनासाठी एक खिडकी योजना उपलब्ध करून देण्याचा मानसही धोरणात व्यक्त करण्यात आला आहे. ज्येष्ठांमध्ये सरकारी योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र, धोरण कागदावरच राहिल्याने केवळ कल्पना, अंमलबजावणी नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे.

जेरियाट्रिक केअर पॉलिसीच्या संदर्भात विविध विभागांकडून लेखी मते मागवली होती. या धोरणाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एकाच छताखाली आरोग्य आणि कायदेशीर सल्ल्यासह वन स्टॉप सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला. धोरणाचा मसुदा तयार केला होता आणि तो नोव्हेंबर 2022 मध्ये समाजकल्याण विभागाकडे सादर केला. यामध्ये यश आल्यास धोरणाची अंमलबजावणी करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरेल.

– डॉ. कल्पना बळीवंत
उपआरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT