वानवडी भागात प्रशांत जगताप यांचे वर्चस्व आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते वानवडी भागातून निवडून येतात. परंतु दोन्ही राष्ट्रवादी जवळ येत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक ही बहुचर्चित ठरली होती.
PMC Election Result Prashant Jagtap win
पुणे : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने खाते उघडले आहे. काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.
पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 ड मधील ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली होती. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजीत शिवरकर यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असणार्यांना प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
प्रशांत जगताप यांचे वानवडी भागात वर्चस्व आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते वानवडी भागातून निवडून येतात. परंतु दोन्ही राष्ट्रवादींची महानगरपालिका निवडणुकीपूर्वी युती झाली. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रशांत पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अखेर या बहुचर्चित निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी बाजी मारली आहे.